Welcome to DUNIYADARI CHAHA

व्यावसिक प्रवास २०१४ ला गणपती माथा, वारजे , पुणे येथे रस्त्याच्या कडेला दुनियादारी मसाला दूध या नावाने सुरू झाला. पुढे दुनियादारी मिसळ हाऊस, (कासारवाडी) दुनियादारी कुल्फी, (वाघोली) असे वेगवेगळ्या क्षेत्रात दुनियादारीने शिरकाव केला. 2018 ऑगस्ट मध्ये दुनियादारी स्पेशल चहाची पहिली शाखा रायसोनी कॉलेज , वाघोली येथे सुरू झाली. पुढे चहा व्यवसायातील संधी आणि भविष्य लक्षात घेऊन चार वर्षातील अनुभवाचा फायदा इतरांना सुद्धा व्हायला हवा या दृष्टीने 2020 मध्ये दुनियादारी चहाची पहिली फ्रेंचाईजी दिली.फ्रॅंचाईजी व्यवसायात उतरताना लोकांना कमी खर्चात चांगली कॉलिटी आणि परिपूर्ण फ्रेंचाईजी देण्याच्या दृष्टीने अभ्यास करून योग्य फ्रेंचाईजी मॉडेल उभे केले . दुनियादारी हेच नाव का? व्यवसाय सुरू करताना दुनियादारी हेच नाव ठेवण्यामागे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे याच्या स्थापनेत मित्रांची असलेली साथ आयुष्यात पाहिलेले चढ उतार आलेले अनुभव आणि त्या सगळ्यातून व्यवसाय सुरू करण्यास मिळालेली प्रेरणा या सगळ्यात दुनियादारी नाव कुठेतरी आपलस वाटले. तुम्ही प्रेमात असा दुःखात असा ,मित्रांसोबत असा की एकटे असा , यशस्वी असा की अयशस्वी असा , दुनियादारी हे नाव प्रत्येक परिस्थितीत प्रत्येकाला आपलंसं वाटतं. उद्दिष्ट - आमच्या ग्राहकांना स्वच्छ आणि चांगल्या वातावरणामध्ये दर्जेदार चहाचा आस्वाद घेणे तसेच दुनियादारी चहा हे विश्वासाच आणि आनंद मी ठिकाण करणे. ध्येय - लोकांना दुनियादारी चहाची शाखा कमी खर्चात उत्तम फ्रॅंचाईजी उपलब्ध करून देणे जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना ती परवडू शकेल आणि त्या माध्यमातून तरुणांना आश्वासक रोजगार उपलब्ध करून देणे


Gallery

News

Check out what's new on our facebook feed!